S M L

तिस-या टप्प्यातल्या निवडणुकीचा प्रचार संपला

28 एप्रिल 15 व्या लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपला. शेवटच्या दिवशी आघाडी आणि युतीच्या नेत्यांनी सभा घेतल्या. तर काही नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. आघाडीनं तसेच युतीच्या वतीनं आपल्याच सर्वाधिक जागा मिळतील असा दावा केला गेला. येत्या गुरुवारी मुंबई आणि उपनगरातील 6 तर ठाणे जिल्ह्यातील 4 , अशा 10 जागांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.मुंबई- ठाण्यातल्या एकूण 10 मतदारसंघांमध्ये 30 एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यातल्या मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे 16 एप्रिलला विदर्भ- मराठवाडा, दुस-या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिलला मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मतदान झालं होतं. त्यानंतर राज्यातल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांनी आपला मोर्चा मुंबई-ठाण्याकडे वळवला. काँग्रेसतर्फे सोनिया गांधी, राष्ट्रवादीतर्फे शरद पवार स्वत: प्रचाराच्या आखाड्यात उतरले, तर मनसेतर्फे राज ठाकरे आणि शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातल्या प्रचाराची बाजू सांभाळली. तिसर्‍या टप्प्यात राज्यामध्ये मुंबई आणि ठाणे मिळून एकूण 10 जागांसाठी 30 एप्रिलला मतदान आहे. हे मतदान सुरळीतपणे पार पडावं यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मतदानाच्या दिवशी मुंबई आणि उपनगरातल्या सहा मतदारसंघातला पोलीस बंदोबस्त पुढील प्रमाणे आहे - 12 ऍडिशनल सीपी, 23 डीसीपी, 50 एसपी , 500 पोलीस इन्स्पेक्टर , 413 असिस्टन्ट पोलीस इन्स्पेक्टर, एक हजार दोनशे पीएसआय. 22 हजार पोलीस, साडेतीन हजार होमगार्डस्, 2 हजार 300 एसआरपी जवान, 1 हजार 600 सीपीआरएफचे जवान.ठाणे जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघातल्या निवडणुकांसाठी 9 डीसीपी , 24 एएसपी , 130 पीआय , 500 पीएसआय , एक हजार 200 पोलीस, बाराशे होमगार्डस्, आठशे सीपीआरएफजवान, सहाशे एसआरपी जवान तैनात करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2009 06:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2009 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close