S M L

स्क्रीनसाठी सलमान-रितेशमध्ये 'तंटा'

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2014 09:28 PM IST

स्क्रीनसाठी सलमान-रितेशमध्ये 'तंटा'

22 जुलै : अभिनेता रितेश देशमुख याने पहिल्यांदाच मराठी सिनेमात 'लय भारी' एंट्री केलीये आणि विशेष म्हणजे याच सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून दबंग स्टार सलमान खानने हटके स्टाईलने हजेरी लावलीये. रितेशच्या मैत्रीखातर सलमानने पहिल्यांदाच मराठी सिनेमात आपली झलक दाखवली. पण आता हीच मैत्री बॉक्स ऑफिसवर शत्रुत्वात रुपांतरीत होण्याची चिन्ह आहे.

त्याचं झालं असं की, सलमान खानचा बहुचर्चित 'किक' सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आता सलमानचा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होणार म्हटल्यांवर स्क्रीनवर कब्जा त्याचाच असणार हे साधं गणित ठरलंय. पण मराठमोळ्या रितेशने अगोदरच बॉक्स ऑफिसवर 'लय भारी' धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत लय भारीच्या निमित्ताने कोणत्या तरी मराठी सिनेमाला सर्वात जास्त स्क्रीन मिळाल्या आहेत.

त्यामुळे लय भारी बॉक्स ऑफिसवर काही कोटींचा गल्ला जमवतोय. रितेश देशमुखचं हे पहिलंवहिलं मराठी पदार्पण सुपरहिट ठरलंय.  लय भारीचे निर्माते सिनेमा थिएटरमधून काढायला तयार नाहीत. अशातच 'किक' 25 जुलैला प्रदर्शित होतोय. त्यामुळे दोन्ही निर्मात्यांमध्ये वाद रंगलाय.

विशेष म्हणजे साजिद नाडियादवालाने 'लयभारी'ची कथा लिहिलेय आणि किकचं दिग्दर्शनही केलंय. आता स्क्रिन्सवरून निर्माण झालेल्या या वादात समझोत्यासाठी कोणता निर्माता एक पाऊल मागे घेतो हेच पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2014 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close