S M L

आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी असं कृत्य करणार नाही -उद्धव

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2014 07:29 PM IST

23udhav_on_police_bharti23 जुलै : महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांकडून झालेल्या प्रकारावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सारवासारव केली. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदू आहोत हे ठासून सांगायला आम्ही कधी मागे पुढे पाहत नाही पण कुणाच्या भावना दुखावल्या जातील असे कृत्य आम्ही कधीच करणार नाही असं खुलासा उद्धव ठाकरे यांनी केलाय.

महाराष्ट्र सदनात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. इतक्या खालच्या पातळीला जाऊन असं कृत्य आम्ही कधी करणार नाही. जे काही करतो ते उघड उघड असतं पण कुणाच्या धार्मिक बाबीत आम्ही आड आलो नाही आणि येणार पण नाही ही आमची वृत्ती नाहीय असंही उद्धव म्हणाले. तसंच आम्ही जे काही तिथे आंदोलन केलं ते दडपण्यासाठी हा कांगावा केला जात आहे असा आरोपही उद्धव यांनी केला.

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सदनामध्ये मिळणार्‍या सेवा-सुविधांबद्दल शिवसेनेच्या 11 खासदारांनी 17 जुलैला आंदोलन केलं होतं. यावेळी जेवणाची तक्रार करताना त्यांनी कॅटरिंग सर्व्हिसच्या सुपरवायझरला जबरदस्तीनं चपाती खायला लावली. हा सुपरवायझर मुस्लीम होता आणि त्याचा रमझानचा उपवास होता, हा उपवास बळजबरीने तोडण्याचा प्रयत्न केला गेला असं वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलंय. या प्रकारामुळे एकच खळबळ उडालीय. यावर उद्धव यांनी आता सारवासारव केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2014 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close