S M L

अव्वल डेक्कन चार्जर्सशी राजस्थान रॉयलसह लढत तर चेन्नई सुपर किंग्जची दिल्ली डेअर डेव्हिल्ससोबत

2 मेआयपीएलमध्ये आज दोन मॅचेसमध्ये लढत आहे. यातली पहिली मॅच पॉईंट टेबलमध्ये क्रमांकावर असलेल्या डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरी मॅच असेल चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यात जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येणार आहे.आयपीएलमध्ये अजून तरी डेक्कन चार्जर्सनं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. वीरेंद्र सेहवागची दिल्ली डेअरडेव्हिल्स या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुध्दच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सनं पॉईंटटेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. 6 मॅचमध्ये तीन विजय मिळवणार्‍या मुंबई इंडियन्सच्या खात्यात आता 7 पॉईंट जमा झाले आहेत. सहा मॅचमध्ये तीन पराभव पत्कराव्या लागलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. किंग्ज इलेव्हनला पराभवाचा धक्का देणारी बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं स्पर्धेत कमबॅक करत तिसरा विजय मिळवलाय आणि या जोरावर त्यांनी पॉईंटटेबलमध्ये थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्ज सहाव्या स्थानावर पोहचली असून राजस्थान रॉयल चेन्नईच्या खालोखाल म्हणजेच सातव्या क्रमांकावर आहे. तर सलग पाच पराभव स्विकारावा लागलेली कोलकाता नाईट रायडर्स तळाला घसरली आहे. त्यामुळे डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांना टफ फाइट देताना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल या टीमला आपली चमकदार खेळी दाखवावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2009 11:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2009 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close