S M L

IPS अधिकारी पारस्करविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2014 07:18 PM IST

IPS अधिकारी पारस्करविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार

sunilparskar24 जुलै : महाराष्ट्र पोलीस दलातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका तरुणीने केलीय. सुनील पारस्कर असं या अधिकार्‍याचं नाव आहे. ही तरुणी व्यवसायाने मॉडेल असून ती मुंबईच्या मालवणी परिसरात राहते.

ती काही कामानिमित्त संबंधित आयपीएस अधिकारी उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना भेटली होती.

यावेळी आपलं काम करून देण्याच्या बहाण्यानं संबंधित अधिकार्‍यांनं आपल्याला अनेकदा हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचं या तरुणीची तक्रार आहे.

मालवणी पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत. याबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close