S M L

आणखी एक विमान !, अल्जेरियाचं 116 प्रवाशांचं विमान बेपत्ता

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2014 11:49 PM IST

आणखी एक विमान !, अल्जेरियाचं 116 प्रवाशांचं विमान बेपत्ता

24 जुलै : आधी मलेशियन एअरलाईन्सच विमान बेपत्ता झालं त्याचं गुढ अजूनही कायम आहे. बुधवारीच तैवानमध्ये एशिया एअरवेजच्या विमानाला अपघात या पाठोपाठ आता अल्जेरियाचं 116 प्रवाशांचं विमान बेपत्ता झाल्याची घटना घडलीय. अल्जेरियाच्या सरकारी कंपनीचं एअर अलजेरी प्रवाशी विमान बुर्किना येथील उआागडूगू विमानतळावरुन आकाशात झेपावले होते आणि त्यानंतर 50 मिनिटांनी याचा संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झालंय.

सिन्हुआ वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, उआगडूगू विमानतळावरुन अल्जेरियाकडे येणारं एएच 5017 विमान मध्यरात्री 1.55 वाजता रवाना झालं होतं. त्यानंतर 50 मिनिटांनी या विमानाचा संपर्क तुटला. विमान बेपत्ता झाल्यानंतर शोध घेण्यास यंत्रणा कामाला लागलीय. या विमानात किती प्रवाशी होते याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार हे विमान ए 320 एअरबस आहे. यात 116 प्रवाशी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 08:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close