S M L

लातूरमध्ये 4कोटींची बोगस बियाणं जप्त

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2014 08:55 PM IST

लातूरमध्ये 4कोटींची बोगस बियाणं जप्त

24 जुलै : लातूर जिल्ह्यातल्या उदगीर एमआयडीसीमध्ये एका गोदामातून 60 टन बोगस सोयाबीन बियाणं तर तोंडार पाटीजवळच्या दुसर्‍या गोदामातून 15 टन बोगस बियाणं पोलिसांनी जप्त केली आहेत. या बियाणांची एकूण किंमत 4 कोटी रुपये एवढी आहे.

मध्यप्रदेशातील सागर सीड्स कंपनीच्या अनमोल जेएस 355 या नामांकित बियाणं कंपनीच्या पिशव्यांमध्ये ही बियाणं होती. ही दोन्ही गोदाम अखिल गफार चौधरी नावाच्या व्यक्तीची आहेत. पण पोलीस चौधरीवर कारवाई करायला तयार नाहीत.

या सर्व धंद्याचा मास्टरमाईंड मध्य प्रदेशचा संजयकुमार  शांतीलाल जैन आहे. फुटाण्याच्या कारखान्यात अवैद्य बोगस बियाणं पॅकिंगचा हा उद्योग चालतो हे उघड झालंय. कृषी विभाग,पंचायत समिती आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तितरित्या ही कारवाई केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 08:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close