S M L

शिवसेनेच्या शिलेदारांची राजनी केली पाठराखण

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2014 11:33 PM IST

शिवसेनेच्या शिलेदारांची राजनी केली पाठराखण

24 जुलै : नेहमी शिवसेनेवर सडकून टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात रोजा तोडण्याचा घडलेल्या प्रकरणात शिवसेनेच्या शिलेदारांची पाठराखण केलीय. जर माणसाला समोरची व्यक्ती जर कोणत्या धर्माची आहे, ती कोण आहे हे जर माहित नसेल तर अशी एखादी गोष्ट अनावधानाने घडली असेल तर त्यावर वाद घालण्याची आणि वाढवण्याची गरज नाही अशी बाजू राज ठाकरे यांनी मांडलीये.

तसंच राजन विचारे यांच्याकडून झालेला प्रकार हा जाणिवपूर्वक नव्हता हे आता तरी स्पष्ट होतंय असंही राज म्हणाले. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज' इथं पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते.

17 जुलै रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा कारणावरुन शिवसेनेच्या खासदारांनी थेट कँटिनवर हल्लाबोल केला होता. यावेळी सेनेचे खासदार राजन विचारे यांनी एका मुस्लीम मॅनेजरच्या तोंडात चपाती कोंबण्याचा प्रयत्न केला. रमजानचा महिना सुरू असल्याने त्याचा रोजा बळजबरीने तोडला गेला असा आरोप विचारेंवर झाला. सेनेच्या या कृत्यावर चौफेर टीका झाली.

उद्धव ठाकरे यांनाही सारवासारव करावी लागली. तर तो व्यक्ती मुस्लीम होता हे मला माहिती नव्हतं असं सांगून विचारे यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणारे राज यांनी या प्रकरणी शिवसेनेच्या शिलेदारांची बाजू घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 11:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close