S M L

'कॉमनवेल्थ'मध्ये भारताची 'गोल्डन' सलामी

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2014 11:48 PM IST

'कॉमनवेल्थ'मध्ये भारताची 'गोल्डन' सलामी

24 जुलै : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने पहिल्याच दिवशी धडाक्यात सुरूवात केलीय. ग्लासगोव्हमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची वेटलिफ्टर संजिता चानूनं गोल्ड मेडल पटकावलंय. महिलांच्या 48 किलो वजनी गटात तिनं हे मेडल जिंकलंय. तर याच गटात मीराबाई चानूनं सिल्व्हर मेडल जिंकलंय.

2010 साली याच क्रीडाप्रकारात भारताने सिल्व्हर आणि ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं होतं.  तर दुसरीकडे ज्युडोमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही गटांत भारतीय खेळाडूंनी फायनलमध्ये धडक मारली आहे. 60 किलो वजनी गटात भारताच्या नवज्योत चानानं तर 48 किलो वजनी गटात सुशीला फायनल फेरीत पोहचलीय. त्यामुळे आणखी दोन सिल्वर मेडल निश्चित झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 11:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close