S M L

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्याच दिवशी भारताने केली सात पदकांची कमाई

Samruddha Bhambure | Updated On: Jul 25, 2014 01:28 PM IST

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्याच दिवशी भारताने केली सात पदकांची कमाई

25  जुलै :  कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं पहिल्या दिवशी सात मेडल्सची कमाई केली आहे. भारताला दोन गोल्ड आणि तीन सिल्वर, दोन ब्राँझ मेडल मिळाला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने पहिल्याच दिवशी धडाक्यात सुरूवात केली आहे.

ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची वेटलिफ्टर संजिता चानूने गोल्ड मेडल आपलं नाव कोरलं आहे. महिलांच्या 48 किलो वजनी गटात तिनं हे मेडल जिंकलं आहे. तर याच गटात मीराबाई चानूने सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात सुखेन डेनं गोल्ड मेडल पटकावलं असून गणेश माळीने याच प्रकारात बाँन्झपदक पटकावलं आहे. ज्युदो प्रकारात भारतानं 2 सिल्व्हर मेडल्स मिळवलेत. ज्युदोत भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी दोन सिल्वर आणि एक ब्राँझ अशी तीन पदकं पटकावली.

त्यामुळे भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुरुवात चांगली झाल्याचं चित्र आहे. भारतीय खेळाडुंची कामगिरी अशीच राहिली तर यावेळी भारताच्या पदकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close