S M L

आपमध्ये आगामी निवडणूक लढवण्यावरून मतभेद

Samruddha Bhambure | Updated On: Jul 25, 2014 01:41 PM IST

आपमध्ये आगामी निवडणूक लढवण्यावरून मतभेद

25  जुलै :  आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज पंजाबमधल्या सुनाम इथे बैठक होत आहे. या बैठकीला पक्षातले राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत 63 सदस्य उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका लढवाव्या की नाहीत याबद्दल पक्षात तीव्र मतभेद आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणूका लढवू नये अस त्यांना वाटतं तर या निवडणुका लढवाव्यात असं योगेंद्र यादवांचं मत आहे. राज्य कार्यकारिणीने निवडणुका लढवू नयेत अशा प्रकारचं मत राष्ट्रीय कार्यकारिणीला कळवलं असल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close