S M L

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी भाजप-सेनेची बैठक

Samruddha Bhambure | Updated On: Jul 25, 2014 03:50 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी भाजप-सेनेची बैठक

25  जुलै :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी भाजप-शिवसेनेची पहिली बैठक आज मुंबईत होत आहे. या बैठकीत भाजपने वाढीव 15 जागांची केली मागणीचं समजतय. तासगाव, गुहागर, कोथरुड, मंबादेवी, विलेपार्ले, भिवंडी, पालघर किंवा डहाणू, तिवसा किंवा अचलपूर आणि धुळे शहरसाठी भाजपने आग्रह धरला असून जागांची अदलाबदल करायची असेल तर त्यातोडीचा मतदार संघ हवाय असं शिवसेनेने म्हणण असल्याचं समजतय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी भाजप-शिवसेनेची पहिली बैठक आज मुंबईत होत आहे. या बैठकीत भाजप-सेना युतीचा जुना फॉर्म्युला बदलावा का? शिवसेनेकडून जागा वाढवून घ्याव्यात का? कुठल्या जागांची अदलाबदल करता येईल. यावर या चर्चा होईल. आजच्या शिवसेना- भाजपच्या बैठकीला भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे- पालवे तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, लीलाधर डाके, गजानन कीर्तीकर हजर राहणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करू इच्छित नाही गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. या प्रयत्नाला घवघवीत यश देखील मिळालं होतं. पण महाराष्ट्रात नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादावरून निवडणुकीत त्याचा फटका बसेल अशी भीती भाजपला वाटत आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदाची चुरस तीव्र झाली असून त्यातच आता भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नावही मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आलं आहेत. त्यामुळे कुणा एकाचं नाव जाहीर केल्याने त्याचा फटका निवडणुकीला बसू शकतो, अशी भीती आता भाजपला वाटत असल्याचं सांगितलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close