S M L

धनगर समाज आरक्षण आंदोलन, 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2014 05:51 PM IST

धनगर समाज आरक्षण आंदोलन, 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

25 जुलै : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा या करता बारामतीमध्ये आंदोलन सुरू आहे. धनगर समाज आरक्षण कृती समितीचे 16 कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 16 उपोषणकर्त्यांपैकी पाच जणांना प्रकृती खालवल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

धनगर समाज आरक्षण कृती समितीने 24 जुलैपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अशी मुदत सरकारला दिली होती. ती मुदत गुरुवारीच संपलीये. मात्र, सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आज बारामतीमधून आंदोलनाची पुढली दिशा ठरवली जाणार आहे. त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

त्यापुर्वी आज धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. दरम्यान, आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार चालढकल करत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2014 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close