S M L

रत्नागिरीमध्ये तीव्र पाणीटंचाई

4 मे, रत्नागिरी दिनेश केळुस्कर जुनाट पाईपलाईनमधून होणारी गळती आणि सरकारी कार्यालयांची थकलेली पाणीपट्टी याकडे रत्नागिरी नगरपालिकेचं चांगलंच दुर्लक्ष्य झालं आहे. याचाच फटका रत्नागिरी शहराला बसला आहे. सध्या या शहारात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे. पण रत्नागिरी पालिका प्रशासानाने शहराला पाणीपुरवठा करणा-या शीळ धरणातला पाणीसाठा कमी झाल्यामुळे एक दिवसा आड पाणी पुरवठा करावा लागत असल्याचं कारण पुढे केलं आहे. रत्नागिरीच्या पाणी टंचाईवर शहराच्या नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजन गगे यांनी संपूर्ण शहराला एक महिना पाणी पुरवठा करायचा झाला तर एक दवसाआड करणंच योग्य होईल असं सांगितलं आहे. ' शहराला पाणीपुरवठा करणा-या पणानवल धरणातला पाणीसाठा सुमारे दोन महिन्यापूर्वीच बंद झाला. आणि शीळ धरणात एक महिना पुरेल एव्हढंच पाणी आहे. डेड स्टॉकमधून पुढचे आठ दहा दिवस आपण भागवू, ' असंही रंजन गगे म्हणाले. शहरातल्या पाणी टंचाईमुळे घरगुती नळधारकांची परिस्थिती बिकट आहे. घरगुती नळधारकांना दरडोई 140 लीटर पाणी देत असल्याचं नगरपरीषद सांगते. पण प्रत्यक्षात जेमेतेम 50 लीटरच पाणी नागरिकांना सध्या मिळत आहे. ' आम्हा घरगुती नळधारकांची स्थिती बरीच बिकट आहे. कसंबसं पाणी आम्ही भरतो. पाणी कमी पडलं तर दुस-यांच्या विहीरीवर जावं लागतं. दुस-यांच्या विहिरीवर गेल्यावर ते नेहमीच पाणी देतात असं नाही , अशी कैफियत रत्नागिरीच्या नागरिक अर्चना कुडतरकर यांनी मांडली. पण प्रत्यक्षात शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी पाईपलाईन अनेक ठिकाणी गळत आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होत आहे. आधि याला जबाबदार आहे ते रत्नागिरी नगरपरिषदेचं नियोजन शून्य पाणी वाटप. शहरात सध्या घरगुती आणि व्यावसायिक अशी एकूण दहा हजार नळ कनेक्शन आहेत. यात दरवर्षी भर पडते. पण पालिकेच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे यंदाही, पावसाळ्यापर्यंत नागरिकांचे पाण्याअभावी असेच हाल सुरू राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2009 07:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2009 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close