S M L

गावितांवर गुन्हा का दाखल केला नाही ? कोर्टाचा सरकारला सवाल

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2014 01:22 PM IST

6376 high_crt_gavit26 जुलै : माजी वैद्यकीयमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही. त्याची कारण सांगा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने आज (शनिवारी) राज्य सरकारला दिला आहे.

विजयकुमार गावीत यांंनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता गोळा केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कोर्टानेचौकशीचे आदेश दिले होते.

अँण्टी करप्शन ब्युरोनं आधी गुप्त चौकशी केली. त्यात अनेक पुरावे आल्यानंतर खुली चौकशी सुरू झाली. मात्र, गुन्हा दाखल केला नाही. याबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

यावेळी न्यायमूर्ती अभय ओक यांनी गावीत यांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल उपस्थित केला. तसंच गुन्हा दाखल का केला नाही याची कारण द्यावीत असे आदेशही दिलेत.

आज सुनावणीच्या वेळी उपअधीक्षक बुधवंत यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांच्या तपासावर नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे लक्ष ठेवतील असं कोर्टाला सांगण्यात आलं. यावेळी कोर्टाने गावीत यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची ही चौकशी करावी आणि तपासच्या प्रगती बाबतचा अहवाल प्रत्येक तारखेला कोर्टात सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2014 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close