S M L

आरक्षणाचा वाद पेटला, धनगर समाज विरुद्ध आदिवासी रस्त्यावर

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2014 06:29 PM IST

आरक्षणाचा वाद पेटला, धनगर समाज विरुद्ध आदिवासी रस्त्यावर

dhangar_vs_adivasi26 जुलै : धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण द्यायला आदिवासी समाजाने विरोध केलाय. आदिवासी कोट्यातून धनगरांना आरक्षण देता येणार नाही त्यामुळे घटनेची पायमल्ली होईल असं स्पष्ट भूमिका आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी मांडलीये.

तसंच आता यावरुन राजकारण होत असले तर त्याला उत्तर दिलं जाईल पण राज्यघटनेत आदिवासींचं संरक्षण करावं अशी राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर जबाबदारी आहे त्यामुळे सोमवारी आम्ही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून विनंती करणार आहोत असंही पिचड यांनी सांगितलं.

दरम्यान, आदिवासी कोट्यातून धनगरांना आरक्षण देण्याविरोधात मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या आदिवासी आरक्षण निर्धार मोर्चात सर्वपक्षीय आदिवासी आमदार, खासदार सहभागी झाले होते. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून हा मोर्चा निघाला.

धनगरांच्या आरक्षणाविरोधात आदिवासी समाज नाही, पण आदिवासींच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण मागण्याची मागणी सामाजिक हिताच्या विरोधी असल्याचं आदिवासींचं म्हणणं आहे. तसंच औरंगाबादमध्येही आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी क्रांती चौकात निदर्शनं केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थ्यानी सहभाग घेतलाय.

धनगरांच्या आरक्षणासाठी नगरमध्ये रास्ता रोको

तर दुसरीकडे, धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी राहुरीमध्ये आज अहमदनगर- मनमाड रस्ता तब्बल 1 तास अडवला गेला.राहुरीमध्ये शेळ्या- मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावर आला होता. यावेळी आरक्षणाला विरोध करणार्‍या मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी यांचा निषेधही या आंदोलनात करण्यात आला.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बारामतीत उपोषणाला बसणार्‍या 16 आंदोलकांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडलीय. त्यामुळे आता आंदोलक आक्रमक झालेत. आरक्षण कृती समितीचे नेते आज रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. घटनेनुसार आरक्षण द्या, त्याचा जीआर बारामतीत येऊ द्या, अशी या कृती समितीची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर रविवारपासून आंदोलनाची दिशा बदलण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येण्याची शक्यता आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2014 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close