S M L

विदर्भ साहित्य परिषदेने मागितला ठाले-पाटील यांचा राजीनामा

4 मे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विदर्भ साहित्य परिषदेने केली आहे. नुकतंच झालेलं 82 वं साहित्य संमेलन तसंच विश्वमराठी साहित्य संमेलन कौतिकरावांच्या मनमानी कारभारामुळे गाजलं. महाबळेश्वरच्या साहित्य संमेलानाकडे रसिकांनी पाठ फिरवली आणि ते अपयशी ठरलं. महाबळेश्वरच्या साहित्यसंमेलनाचे नियोजीत अध्यक्ष आनंद यादव यांच्या राजीनाम्याचा वाद ते प्रत्यक्ष संमेलनस्थळी उद्भवलेला प्रकाशकांसोबतचा वाद या सर्वच प्रसंगी कौतिकराव टीकेचे लक्ष्य राहिले. पण साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्था मात्र त्यांच्या या मनमानी कारभारामुळे धुसफुसत होत्या अखेर त्याचा स्फोट आज विदर्भ साहित्य परिषदेच्या रूपाने झाला आहे. ठाले-पाटील स्वत:हून राजीनामा देणार नसतील तर महामंडळाने त्यांची निवड रद्द करावी अशीही मागणी विदर्भ साहित्य परिषदने केली आहे. महाबळेश्वर साहित्य संमेलनाचं अपयश आणि सांगलीत भरलेल्या साहित्य संमेलनात कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे परिषदेच्या पदाधिका-यांची झालेली मानहानी यामुळे त्यांचा राजीनाम्याची मागण्याची पाळी आली आहे, असंही विदर्भ साहित्य परिषदेच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2009 08:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2009 08:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close