S M L

महाराष्ट्रकन्या राहीचा ‘सुवर्ण’वेध

Samruddha Bhambure | Updated On: Jul 27, 2014 01:11 PM IST

महाराष्ट्रकन्या राहीचा ‘सुवर्ण’वेध

 27  जुलै : ग्लासगोव्हमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारचा दिवस नेमबाजांनी गाजवला. नेमबाजांनी भारतासाठी पाच पदकांवर 'नेम' साधला तर ज्युदोमध्ये 78 किलोवरील गटात राजविंदर कौरने ब्राँझ मेडल जिंकले. महाराष्ट्रकन्या राही सरनोबत, राजस्थानच्या अपूर्वी चंदेला यांनी गोल्डन मेडल्स तर अनिसा सय्यद, अयोनिका पॉल, प्रकाश नांजप्पा यांनी सिल्व्हर मेडल्स जिंकली.

महिलांच्या 25 मी. पिस्तूल प्रकारात कोल्हापूरच्या राहीने गोल्ड मेडल पटकावलं तर याच गटात अनिसा सय्यदने सिल्व्हर मेडल पटकावलं. गोल्डन मेडल्सच्या सामन्यात राहीने 8-2 असे गुण मिळवत ही कामगिरी केली. त्यापूर्वी महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या अपूर्वी चंडेलानं गोल्ड मेडल मिळवलं तर याच गटात अयोनिका पॉलने सिल्व्हर मेडल मिळवलं. पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तूल प्रकारात प्रकाश नांजप्पानेही भारतासाठी सिल्व्हर मेडल जिंकले. आतापर्यंत भारताच्या नावावर 5 गोल्ड मेडल्स जमा झाले आहेत.

तिसर्‍या दिवसअखेर कॉमनवेल्थमध्ये भारताची आणि इतर देशांची कामगिरी पाहूयात...

भारताची कामगिरी

 • गोल्ड मेडल 5
 • सिल्व्हर मेडल 7
 • ब्राँझ मेडल 5

मेडल टेबल

 • इंग्लंड - 37 मेडल्स
 • ऑस्ट्रेलिया - 40 मेडल्स
 • स्कॉटलंड - 19 मेडल्स
 • कॅनडा - 13 मेडल्स
 • भारत - 17 मेडल्स

भारताची कामगिरी

 • राही सरनोबत - 25 मी. पिस्तूल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल
 • अपूर्वी चंडेला - 10 मी. एअर रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल
 • अयोनिका पॉल - 10 मी. एअर रायफल शूटिंगमध्ये सिल्व्हर मेडल
 • प्रकाश नांजप्पा - 10 मी. एअर रायफल शूटिंगमध्ये सिल्व्हर मेडल
 • अनिसा सय्यद - 25 मी पिस्तूल शूटिंगमध्ये सिल्व्हर मेडल
 • राजविंदर कौर - ज्युडोमध्ये ब्राँझ मेडल
 • ओंकार ओटारी - वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ मेडल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2014 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close