S M L

हिंमत असेल तर थांबवून दाखवा, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 27, 2014 07:48 PM IST

हिंमत असेल तर थांबवून दाखवा, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

mumbai terror attack

27  जुलै :  मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे. या धमकीपत्राची पोलीस कसून चौकशी करत असून मुंबईतील दहशतवादविरोधी पथकांना हायअलर्ट जारी केला गेला आहे.

मुंबईचे आयुक्त राकेश मारिया यांना दोन दिवसांपूर्वी धमकी देणारे एक पानी पत्र मिळाले आहे. '1993 मध्ये तुम्ही नशीबवान ठरला होता. मात्र आता हिंमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा' अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे. पत्राखाली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नाव असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे पत्र कुठून आले, पत्र खरोखरच दहशतवादी संघटनेने पाठवले की खोडसाळपणाने पत्र पाठवण्यात आले याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. तसेच या पत्रानंतर दहशतवादविरोधी पथकाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मुंबईतील बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2014 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close