S M L

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2014 08:34 AM IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

cm news belgoa

27  जुलै :   कर्नाटक पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सांगितलं. कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधल्या ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करणं थांबवावं, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बेळगावमध्ये पुन्हा उभारलेला 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' हा फलक कर्नाटक पोलिसांनी रविवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात पुन्हा काढून टाकला आहे. या घटनेनंतर येळ्ळूरमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी मराठी भाषिक नेत्यांची धरपकड सुरू केली. कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिक लोकांवर अमानुष लाठीमार केला. लोकांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. महिलांनाही पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांनी आपले पैसे आणि मोबाईलही नेल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. 50 जणांवर लाठीमार केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2014 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close