S M L

धनगर आरक्षणाचा वाद चिघळला

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2014 11:51 AM IST

धनगर आरक्षणाचा वाद चिघळला

27  जुलै :  सरकार धनगर समाजाच्या आंदोलनाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत धनगर समाजाच्या कृती समितीने आरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. रविवारी कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून बारामतीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

शनिवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबतची आरक्षणाविषयीची बैठक निष्फळ ठरल्यावर रविवारी बारामतीमध्ये धनगर समाजाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकार्‍यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांनी राजीनामाही दिला आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 25 आंदोलकांना ताब्यात घेतलं. या मागणीसाठी धनगर समाज मोठ्या संख्येने आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी बारामतीची मुख्य बाजारपेठही बंद पाडली. धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करावं, अशी धनगर समाजाची मागणी आहे. दरम्यान, धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजप आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2014 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close