S M L

धनगर समाजाचे कार्यकर्ते उपोषण मागे घेणार?

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2014 11:39 AM IST

धनगर समाजाचे कार्यकर्ते उपोषण मागे घेणार?

28   जुलै :   बारामतीत सुरू असलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचं उपोषण आज मागे घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे. देवेंद्र फडवणीस, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी दिली आहे. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आरक्षण कृती समितीने स्पष्ट केलं आहे. महायुतीचा एखादा महत्त्वाचा नेता आज बारामतीमध्ये हजर राहण्याची शक्यता आहे.

महायुतीची जागावाटपची बैठक संपल्यानंतर आज देवेंद्र फडवणीस, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बारामतीमध्ये धनगर कार्यकर्ते उपोषण मागे घेतील पण आंदोलन सुरूच राहिल असं महादेव जानकर यांनी सांगितलं आहे.

सरकार धनगर समाजाच्या आंदोलनाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत धनगर समाजाच्या कृती समितीने आरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. रविवारी कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून बारामतीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. संतप्त आंदोलनकर्त्यांनी काल पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 25 आंदोलकांना ताब्यात घेतलं.

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज मोठ्या संख्येने आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी बारामतीची मुख्य बाजारपेठही बंद पाडली. धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करावं, अशी धनगर समाजाची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2014 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close