S M L

महायुतीची बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली

Sachin Salve | Updated On: Jul 28, 2014 06:10 PM IST

महायुतीची बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली

28 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महायुतीची बैठक आज (सोमवारी) पार पडली मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. याबाबतची पुढची बैठक 5 किंवा 6 ऑगस्टला होणार आहे. कुठल्या मुद्द्यांवर जागावाटप व्हावं यावर बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीत शिवसेनेचे सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते आणि रामदास कदम तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तर मित्रपक्षांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे, सुमंतराव गायकवाड आणि अविनाश महातेकर हे नेते उपस्थित होते.

मागिल आठवड्यातही युतीची बैठक पार पडली होती. पण या बैठकीला सेना आणि भाजपचेच नेते उपस्थित होते. आज घेण्यात आलेल्या बैठकीला घटक पक्षांनीही निमंत्रण देण्यात आलं. पण जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2014 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close