S M L

भले शाब्बास, जितू रायने पटकावले गोल्ड मेडल

Sachin Salve | Updated On: Jul 28, 2014 10:08 PM IST

भले शाब्बास, जितू रायने पटकावले गोल्ड मेडल

jitu28 जुलै : ग्लासगोव्ह इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची घौडदौड सुरूच आहे. आज भारताला 7 वं गोल्ड मिळालंय. भारताच्या जितू रायनं 50 मीटर पिस्तुल प्रकारात गोल्ड मेडल पटकावलंय.

तर याच प्रकारात गुरपाल सिंगला सिल्व्हर मेडल मिळालंय. जितू रायच्या यशामुळे भारताच्या खात्यात सात गोल्ड मेडल जमा झाले आहे. तर दुसरीकडे ऑलिम्पिक ब्राँझ मेडल विजेता नेमबाज गगन नारंगने पुरूष गटात 50 मीटर रायफल स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे.

नारंगने रायफल स्पर्धेत 620.5 गूण मिळवत तिसरे स्थान पटकावले आणि फायनलमध्ये जागा मिळवली. नारंगने फायनलमध्ये वेध साधत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. मात्र नेमबाज जॉयदीप करमाकरचे फायनल गाठण्याचे स्वप्न अधूरे राहिले. करमाकर 617 गूण मिळवून नव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आतापर्यंत भारताच्या खात्यात 7 गोल्ड, 11 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल जमा झाले आहेत.

कॉमनवेल्थमध्ये मेडलची लयलूट

  • 07 - गोल्ड मेडल
  • 11 - सिल्व्हर मेडल
  • 07 -ब्राँझ मेडल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2014 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close