S M L

मुरबाड-माळशेज मार्गावर भीषण अपघातात 4 ठार

Sachin Salve | Updated On: Jul 28, 2014 07:28 PM IST

मुरबाड-माळशेज मार्गावर भीषण अपघातात 4 ठार

28 जुलै : मुरबाड - माळशेज मार्गावर भीषण अपघात झालाय यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी आहे. जखमींवर मुरबाड रूग्णालयात उपचार सुरू आहे.

टोकावडेहुन मुरबाडकडे प्रवासी वाहतूक करणारी वैशाखरे गावातील दिपक घरत यांच्या काळी पिवळी गाडीतून 13 प्रवासी मुरबाडच्या दिशेने प्रवास करीत होते. माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्र.222 वरील वडाचापाडा गावा जवळ लोखंडी प्लेट घेवून जाणार्‍या कंटेनर जवळून गाडी गेली असता कंटेनरमधून बाहेर आलेल्या प्लेटने जीपचा पत्रा चिरून आतील चार प्रवाशांचा जीव घेतला तर पाच प्रवासी जखमी केले आहेत.

चारही मृत व्यक्ती टोकावडे परीसरातील असून नातेवाईकांनी व संतप्त जमावाने कंटेनरला आग लावली तसंच नातेवाईकांनी रास्ता रोकोही केला. त्यामुले मुरबाड, सरळगावपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. टोकावडे, किन्हवली, मुरबाड पोलिसांच्या तुकड्या हजर होवून जमावाला पांगविण्याचा केविलवाना प्रयत्न करीत परंतू संतप्त जमावापुढे तेही हतबळ झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2014 07:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close