S M L

पारसकरांच्या अटकपूर्व जामिनाविरोधात मुंबई पोलिसांची कोर्टात धाव

Sachin Salve | Updated On: Jul 28, 2014 10:53 PM IST

sunilparskar28 जुलै : मॉडेल बलात्कार प्रकरणी वरीष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर यांच्या अडचणी आणखी वाढ भरलीय. त्यांच्या जामिनाला 'मुंबई पोलीस', कोर्टात विरोध करणार आहेत, अशी माहिती क्राईम ब्रांचचे सह आयुक्त सदानंद दाते यांनी दिलीय.

ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथले काही साक्षीदार पोलिसांना उपलब्ध झाले आहेत. पारसकर यांची आज साडेतीन तास चौकशी झालीये. या दोघांमध्ये झालेल्या संवादाचे पुरावे गोळा करण्याचं काम आता पोलीस करत आहेत.

गरज पडली तर पीडित मॉडेलचा पुन्हा जबाब नोंदवणार असल्याचंही त्यानी सांगितलंय. मुंबईतल्या मॉडेलनं पारसकर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याबद्दल तिने तक्रारही दाखल केली होती. पोलीस उपायुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त के. प्रसन्न, महिला अत्याचारविरोधी प्रमुख शारदा राऊत यांनी पारसकर यांची चौकशी केलीये.

दरम्यान, मुंबई सेशन कोर्टाने तात्पुरता जामीन दिल्यामुळे 31 जुलैपर्यंत त्यांना अटक करता येणार नाही. यापुढची सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2014 10:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close