S M L

राज्यातील कृषी बाजार समित्या राम भरोसे, 144 समित्यांवर सचिवच नाही!

Samruddha Bhambure | Updated On: Jul 29, 2014 02:44 PM IST

राज्यातील कृषी बाजार समित्या राम भरोसे, 144 समित्यांवर सचिवच नाही!

शैलेश तवटे, नवी मुंबई

29  जुलै :  राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. राज्यातल्या 144 बाजार समित्यांवर सचिव नसल्याने अनागोंदी कारभार सुरू झाला आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात हा घोळ समोर आला. राज्यातल्या निम्म्या बाजार समित्यावर नियंत्रण नसल्याने तिथला कारभारही थंडावला आहे.

राज्यातल्या 300 बाजार समित्यांपैकी 144 बाजार समित्यांवर सचिवच नसल्याचे समोर आलं आहे. राज्यातल्या बहुतांशी बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने सचिव म्हणून आपलाच कारभारी ठेवला जातो. मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण-विखे पाटील यांनी केला आहे तर राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बाजार समित्यांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे, त्यावर काँग्रेसची नजर असल्याचा आरोप बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे.

आर्थिक गैरव्यवहारामुळेच या बाजार समित्या गाजत असतानाच राज्यातील गेल्या पाच वर्षांत झालेल्या आवकमध्ये घोळ असल्याचे समोर आले आहे. सचिव नियुक्ती आणि बाजार समित्यांमधल्या गैरव्यवहारामुळे हे प्रकरण आता न्यायालयीन वादात अडकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2014 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close