S M L

डहाणूत सूर्या नदीला पूर, प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Jul 29, 2014 03:46 PM IST

डहाणूत सूर्या नदीला पूर, प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा

29  जुलै : डहाणूत गेले तीन दिवस संततधार पडणार्‍या पावसाने डहाणूकरांना झोडपलंय. गेल्या 24 तासांत 217 मिमी. पावसाची नोंद झाली आहे तर आतापर्यंत एकूण 1097 मिमी पावसाची नोंद झाली आहे. डहाणू येथील सूर्या नदी दुथडी भरून वाहत आहे. सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या प्रशासनातर्फे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 53 वर्षांच्या रमेश बोगे यांचा सूर्या नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. डहाणूजवळचे कासा गाव पूर्ण पाण्याखाली गेलंय तसेच आजूबाजूंच्या गावातही रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2014 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close