S M L

धनगर आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटू नका, पुरकेंचं पवारांना पत्र

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2014 05:30 PM IST

धनगर आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटू नका, पुरकेंचं पवारांना पत्र

vasant_purke_on_pawar29 जुलै : धनगर आरक्षणाबाबत विधानसभेचे अध्यक्ष वसंत पुरके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहलंय. बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांना मताधिक्य कमी झालं. त्यामुळे राजकीय दबावापोटी धनगर आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटू नका अशी विनंती त्यात करण्यात आली आहे.

आदिवासींचा आरक्षणाचा हक्क हिरावून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विरोध करत राजर्षी शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या ऐतिहासिक कार्याला यामुळे धक्का लागेल, असंही पुरके म्हणाले.

आदिवासी समाज आजही अत्यंत उपेक्षित आहे. गडचिरोली, मेळघाट सारख्याभागात आदिवासी आजही अत्यंत हलाखीचे जीवन जगतात त्यामुळे आरक्षणामध्ये कुठलाही बदल करता कामा नये असेही पुरके म्हणाले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यासाठीच धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा पेटवल्याची टीका बसपाने केली आहे. तर शिवसंग्रामने आरक्षणाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2014 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close