S M L

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Samruddha Bhambure | Updated On: Jul 30, 2014 03:34 PM IST

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

30   जुलै :  मुंबई, ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार तर बदलापूर-अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाचा जोर जास्त आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी सकाळी मुंबईतील रेल्वे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावर 10 मिनिटे तर मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकल 20-25 मिनिटे उशिराने धावत आहेत. बंद इंडिकेटर आणि उद्घोषणा नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2014 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close