S M L

मुंबईत पावसाची उसंत, राज्यात मात्र दमदार हजेरी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 30, 2014 01:56 PM IST

India Mansoon

30  जुलै :   मुंबईत मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पडत असलेल्या पावसाने सकाळच्या वेळेत थोडीशी उसंत घेतली आहे. मात्र, हवामान खात्याने येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मुंबई शहरात गेल्या 24 तासांत सांताक्रुझमध्ये 48.3 मिलीमीटर तर कुलाब्यात 26.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. धरण परिसरातही मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत झालेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करण्यार्‍या धरणांमधला साठा वाढला आहे. तुळशी धरणासह इतर 6 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने मुंबईकरांना आता पाणीकपातीच्या संकटापासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईत कालच्या एका दिवसात 34 दिवस पुरेल एवढा पाऊस झाला आहे.

मुंबईकरांना दिलासा

  • तानसा तलाव - 276 मिमी
  • मोडकसागर तलाव - 216 मिमी
  • भातसा तलाव - 247 मिमी
  • अप्पर वैतरणा - 145 मिमी
  • मध्य वैतरणा - 107 मिमी

पुण्यात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. डेक्कन जिमखान्या जवळचा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. नदी पात्राजवळच्या घरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

खडवासला धरणातुन पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. 5 हजार 136 क्युसेक्स वेगाने पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो. 12 तासात माथेरानमध्ये 230 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भीरा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत तर अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहा नगर पालिका हद्दीतल्या आणि दमखाडी इथल्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बदलापूरमध्ये कोंडेश्वर इथं पावसाळी पिकनीकसाठी आलेले 20 पर्यटक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकून बसले होते. मात्र या सर्व पर्यटकांची स्थानिक, पोलीस आणि अग्निशामन दलाने सुखरुप सुटका केली.

डहाणूमध्ये धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत. नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. सूर्या नदीनं पातळी ओलांडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2014 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close