S M L

मुंबईकरांना पाणीकपातीतून काहिसा दिलासा

Samruddha Bhambure | Updated On: Jul 31, 2014 03:32 PM IST

dam

31  जुलै :  मुंबईकरांसाठी खूशखबर! सतत पडणार्‍या पावसानं मुंबईतली पाणीकपात अंशत: मागे घेण्यात आली आहे. मुंबईत सध्या 20 टक्के पाणीकपात सुरू होती आता ही पाणीकपात 10 टक्के करण्यात आली आहे.

मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधला पाणीसाठा वाढल्यामुळे मुंबईतली पाणीकपात कमी करण्यात आली आहे. तुळशीपाठोपाठ मोडकसागर धरणही भरून वाहत आहे.

मुंबईकरांना दिलासा

  • मोडकसागर - 1,28,925 दशलक्ष लीटर
  • तानसा - 85,187 दशलक्ष लीटर
  • विहार - 15,268 दशलक्ष लीटर
  • तुळशी - 8,046 दशलक्ष लीटर
  • अप्पर वैतरणा - 80,973 दशलक्ष लीटर
  • भातसा - 2,85,501 दशलक्ष लीटर
  • मध्य वैतरणा - 82,342 दशलक्ष लीटर

दरम्यान, मुंबईत आताही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेले काही दिवस पावसाने चांगली हजेरी लावली आहे आणि येत्या काही दिवसांतही पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close