S M L

चेंबूरमध्ये दरड कोसळून 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2014 05:02 PM IST

चेंबूरमध्ये दरड  कोसळून 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

chembur31 जुलै : मुंबईतील चेंबूरमधील वाशीनाका इथं दरड कोसळून एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

पावसामुळे दरड कोसळून ही दुर्घटना घडलीय. झोपडीवर दगड पडण्याचा आवाज आल्यानंतर घरातले सर्वजण बाहेर पडले. पण सहा वर्षांचा गणेश कुर्‍हाडे झोपडीतच अडकला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

गणेशला शताब्दी हॉस्पिटलमध्ये भरती केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वाशी नाका येथे डोंगरावर सह्याद्रीनगर इथं ही घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाचं पथक मदतकार्यासाठी पोहोचलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close