S M L

काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून डाव्यांमध्ये संभ्रम

6 मे, दिल्ली काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून डाव्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सीपीएम नेते सिताराम येच्युरी आणि सीपीआयचे ए. बी. वर्धन यांच्यात एकवाक्यता नसल्याची चिन्हं आहेत. मंगळवारी दिल्लीत राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषेदत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी ' काँग्रेसनं विरोधी बाकावर बसण्यासाठी नव्हे तर निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुक लढवली आहे, असं म्हणत या निवडणुकांमध्ये डाव्यांचा काँग्रेसला पाठिंबा मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र याच वक्तव्याबाबत सीपीएम आणि सीपीआयमध्ये संभ्रम आहे. सीपीएमचे नेते सिताराम येचुरी यांनी राहुल गांधी यांच्या निर्णयाचं स्वागत करत काँग्रेसशी आघाडी करण्याचा पर्याय खुला असण्याचा संकेत दिलेत. तसंच निवडणुकांनतरच आघाडीबाबतचा निर्णय होईल, असंही ते म्हणाले. पण ' काँग्रेस पक्ष आपली धोरणं बदलायला तयार नाही. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देणार नाही, असं परखड मत सीपीआयचे ए. बी. वर्धन यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना व्यक्त केलं. त्यावेळी ' काँग्रेसशी कित्येक मुद्द्यांबाबत आमचे मतभेद कायम आहेत, ' असंही ए.बी. वर्धन म्हणाले. या मुलाखतीतीत वर्धन यांना शरद पवार आणि मायावतींविषयीही विचारलं असता त्यांनी ' पवारांच्या क्षमतेविषयी शंका नाही पण पवारांकडे आवश्यक संख्याबळ नाही. मायावतींचा पंतप्रधानपदाचा दावा योग्य आहे ', असं म्हटलंय. यंदा तिसर्‍या आघाडीची सत्ता आल्यास सीपीआय सरकारमध्ये सामील होईल, असा आशावाद वर्धन यांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2009 04:45 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2009 04:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close