S M L

रत्नागिरीत डोंगरपायथ्याशी 20 घरं मृत्यूच्या छायेत

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2014 07:11 PM IST

रत्नागिरीत डोंगरपायथ्याशी 20 घरं मृत्यूच्या छायेत

01 ऑगस्ट : पुण्याजवळ माळीण गावात डोंगरकडा कोसळल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. मात्र माळीण गावात घडलेल्या घटनेमुळे राज्यातील ठिकठिकाणी डोंगरपायथ्याशी असणार्‍या गावात भीतीच वातावरण पसरलंय.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये कांदोशी -सुतारवाडी इथला उंच डोंगराचा मोठा भाग खचल्यानं डोंगरीच्या पायथ्याशी असणार्‍या या गावातील 20 घरांना धोका निर्माण झाला आहे. यातली 7 घरं डेंजर झोनमध्ये आहेत.

गेल्या आठवड्यात याच ठिकाणी डोंगराचा मोठा भाग खचला आणि डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या सुतार वाडीतील सात घरांच्या अंगणाच्या छतावर मातीचा ढिगारा आला.

गावकर्‍यांनी ती माती आता हटवली आहे. पण आता इथल्या डोंगराला तडा गेलाय. तसेच मोठा मातीचा ढिगारा डोंगरावर असणार्‍या मोठ्या दगडामागे आहे. त्यामुळे रहिवाशांना भीतीच्या छायेतच रहावं लागतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2014 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close