S M L

मेट्रोसाठी यूपीएने राज्य सरकारला ब्लॅकमेल केलं -सोमय्या

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2014 10:04 PM IST

kirit somiya sot01 ऑगस्ट : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई मेट्रोबाबत यूपीए सरकारवर आरोप केलाय. मुंबई मेट्रोला मेट्रो कायद्यात आणण्यासाठी तत्कालीन यूपीए सरकारनं महाराष्ट्र सरकारला ब्लॅकमेल केलं असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

केंद्र सरकार मेट्रोवर व्हायेबिलिटी गॅप फंडिंग देते. मुंबई मेट्रोसाठी 160 कोटी 50 लाख रुपयांचं फंडिंग शहरी विकास मंत्रालय करणार होते.

पण मुंबई मेट्रो ही देशाच्या मेट्रो कायद्यात येत नाही तोवर मेट्रोसाठीचा निधी राखून ठेवला जाईल असं तत्कालीन शहर विकास मंत्री कमलनाथ यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बजावलं होतं.

आणि या पत्रानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई मेट्रोला देशाच्या मेट्रो कायद्यात समाविष्ट करायला परवानगी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2014 10:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close