S M L

पारसकरांच्या बाबतीत सबुरीने घ्या, सेनेचा पोलिसांना सल्ला

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2014 05:48 PM IST

पारसकरांच्या बाबतीत सबुरीने घ्या, सेनेचा पोलिसांना सल्ला

02 ऑगस्ट : मॉडेलचा विनयभंग आणि बलात्कार केल्याचा आरोप असणार्‍या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर यांच्यासाठी आता शिवसेना धावून आलीय. शिवसेनेनं पारसकरांचं समर्थन केलंय. सत्य बाहेर येईपर्यंत पारसकरांची फरफट होऊ नये, बलात्कार म्हणजे काय ? अशा आशयाचा अग्रलेख सेनेचं मुखपत्र 'सामना'न छापण्यात आला आहे.

पारसकरांच्या बाबतीत पोलीस खात्याने हे प्रकरण संयमानं हाताळावं असा सल्लाही सेनेनं दिलाय. विनयभंग,बलात्कार हे प्रकार अमानुष आहेतच पण अशा प्रकारचे खोटे आरोप करून स्त्रीत्वाचा गैरफायदा घेण्याचे प्रकारही समस्त महिलावर्गास आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत आहेत. बाकी सत्य-असत्याची पडताळणी करण्यास न्यायदेवता सक्षम आहेच.

पारसकर प्रकरणातील मॉडेलचा आगापिछा काय आहे व इतके दिवस मधुर संबंध असताना बलात्कार कसा झाला? असा प्रश्न सामान्यांना पडतो, पण पोलिसांना पडत नाही. या प्रकरणात सहा महिन्यानंतर बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. म्हणजे बलात्कार झाला हे कळण्यास सहा महिने लागले काय ? असा सवालच सेनेनं उपस्थित केलाय.

काय लिहिलंय 'सामना'त (जसेच्या तसे)

"पारसकर प्रकरणातील सत्य काय आहे याचा खुलासा योग्य वेळी होईल, पण तोपर्यंत पारसकरांची फरफट होऊ नये. पोलीस खात्यातील लोकांनी तरी संयमाने हे प्रकरण हाताळावे. विनयभंग, बलात्कार हे प्रकार अमानुष आहेतच. पण अशा प्रकारचे खोटे आरोप करून स्त्रीत्वाचा गैरफायदा घेण्याचे प्रकारही समस्त महिलावर्गास आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत आहेत. बाकी सत्य-असत्याची पडताळणी करण्यास न्यायदेवता सक्षम आहेच. पारसकर प्रकरणातील मॉडेलचा आगापिछा काय आहे व इतके दिवस मधुर संबंध असताना बलात्कार कसा झाला? असा प्रश्न सामान्यांना पडतो,पण पोलिसांना पडत नाही. या प्रकरणात सहा महिन्यानंतर बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. म्हणजे बलात्कार झाला हे कळण्यास सहा महिने लागले काय?

मॉडेलच्या मोबाईलचा शोध

दरम्यान, या प्रकरणात मॉडेलच्या मोबाईल फोनचा शोध क्राईम ब्रॅचचे अधिकारी घेत आहेत. या मोबाईल शोधासाठी सुनिल पारसकर यांची लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. हा मोबाईल फोन या प्रकरणातला महत्वाचा दुवा आहे. हा मोबाईल फोन ही मॉडेल बर्‍याच दिवसापासून वापरत होती. या मोबाईलमध्ये मॉडेलचे आणि डीआयजी सुनील पारसकर यांचे हॉटेलमध्ये एकत्रित फोटो असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोघांनी एकमेकांना केलेले एसएमएस सुद्धा आहेत. पारसकर यांनी हा मोबाईल काढून घेतला होता आणि त्या बदल्यात या मॉडेलला नवीन मोबाईल दिला होता. या मोबाईलचा शोध क्राईम ब्राँचचे अधिकारी घेत आहेत. हा मोबाईल सापडल्यास पारसकर अडचणीत येतील. या मोबाईल शोधासाठी पारसकर यांची लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2014 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close