S M L

कोल्हापूरचं राधानगरी धरण 100 टक्के भरलं

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2014 01:35 PM IST

कोल्हापूरचं राधानगरी धरण 100 टक्के भरलं

02 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहिसा ओसरलाय. पण धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याला वरदान ठरलेलं राधानगरी धरण आता 100 टक्के भरलंय. रात्री 8 वाजता या धरणाचे 2 स्वयंचलीत दरवाजे उघडले आहे. त्यामधून 4 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी हे धरण बांधलंय आणि त्याला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. त्यातले 3 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे उघडले गेले आहे. त्यामुळे आता धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पंचगंगा नदीसह अनेक नद्यांचं पाणीही पात्राबाहेर आलंय.

तर जिल्ह्यातील 83 बंधारे पाण्याखाली गेले असून 40 मार्गांवरची वाहतूक अंशतः बंद झालीय. दरम्यान, अलमट्टी धरण 88 टक्के भरलं असून पावसाचा जोर जर कायम राहिला तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळसह सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा धोका निर्माण होण्याची शक्यताय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2014 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close