S M L

'कानडी'गिरी सुरूच, सीमाभागात मराठी दैनिकांवर कारवाईचा इशारा

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2014 09:24 PM IST

'कानडी'गिरी सुरूच, सीमाभागात मराठी दैनिकांवर कारवाईचा इशारा

02 ऑगस्ट : बेळगाव सीमाभागात मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारने आता मराठी भाषकांचा आवाज दाबण्याचा विडाच उचलला आहे. सीमाभागातल्या मराठी वृत्तपत्रांतील मजकुराचं भाषांतर करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये काही भावना भडकावण्याचा प्रयत्न झाला असेल तर संबंधित वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कन्नड संघटनेचे कार्यकर्ते येळ्ळूर गावात प्रवेश करतील म्हणून बेळगावहून येळ्ळूरकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले. तसंच बंगळूरूहून बेळगावकडे येणार्‍या कन्नड वेदिकेचा अध्यक्ष नारायण गौडा याला हुबळीमध्ये अटक करण्यात आली आहे.

'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' हा फलक न्यायालयाच्या आदेशाच निमित्तकरून उद्‌ध्वस्त केल्यानंतर कानडी पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष हल्ला केला आणि आता त्यानंतर कानडी पोलिसांनी आपला मोर्चा सीमा भागातील मराठी जनतेचे मुखपत्र असणार्‍या एकीकरणच्या आंदोलनांला पाठिंबा देणार्‍या मराठी वृत्तपत्रावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. बेळगावातील येळ्ळूरमध्ये झालेल्या तणावाला आणि सुप्रीम कोर्टाने कर्नाटक सरकारला फटकारल्यानंतर कर्नाटक पोलिसांचे पित्त खवळले असून त्यांनी चक्क वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे ठरविले आहे.

बेळगावातील सीमा लढ्यातील मराठी दैनिक 'तरुण भारत' आणि 'पुढारी' या दैनिकावर कारवाई करण्याचे संकेत उत्तर विभाग पोलीस निरीक्षक भास्कर राव यांनी दिले आहेत. या वृत्तपत्रातील येळ्ळूर संबंधी बातम्यांचं भाषांतर करण्याचं काम सुरू असून जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत असा ठपका ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसात येळ्ळूर घटनेला जबाबदार धरून बेळगावातील काही मराठी वृत्तपत्रांनी जिल्हा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या बदनामी करणार्‍या बातम्या प्रसारित करून सरकार आणि पोलिसांचा अपमान केला आहे असा आरोप पोलीस निरीक्षक भास्कर राव यांनी केलाय. तसंच या सगळ्या बातम्याच्या भाषांतर करत असून या वृत्त पत्रावर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही शांती प्रस्थापित करण्या साठी प्रयत्न करत आहोत असंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ उद्या रविवारी येळ्ळूरला जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, विद्या चव्हाण आणि इतर पदाधिकारी हे या शिष्टमंडळात असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2014 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close