S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडूमध्ये दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Aug 3, 2014 07:59 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडूमध्ये दाखल

Modi in nepal

03  ऑगस्ट :  भारत आणि नेपाळ या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर गेले असून, आज सकाळी ते काठमांडूमध्ये दाखल झाले. यावेळी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

पंतप्रधान मोदी हे आज सकाळी दोन दिवसांसाठी नेपाळच्या दौर्‍यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ यांचे अनेक वर्षांपासून दृढ संबंध आहेत. दोन्ही देशातील संस्कृती समान आहेत. नेपाळ दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध करारांवर स्वाक्षर्‍या होणार आहेत. भारताचे पंतप्रधान सतरा वर्षानंतर नेपाळचा दौरा करणार आहेत. माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांनी 1997 मध्ये नेपाळचा दौरा केला होता. शेजारील देशांशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. पंतप्रधान मोदी दौर्‍यादरम्यान प्रसिद्ध मंदिर पशुपतीनाथ मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार आहेत. शिवाय, विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. पंतप्रधानांच्या भूतान दौर्‍यानंतर त्यांना नेपाळ सरकारने आमंत्रित केले होते. मोदींबरोबर या दौर्‍यात 50 जणांचे शिष्टमंडळ आहे. मात्र, यामध्ये एकही मंत्र्याचा समावेश नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2014 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close