S M L

ग्लासग्लोमध्ये 2 भारतीय अधिकार्‍यांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 3, 2014 08:26 PM IST

ग्लासग्लोमध्ये 2 भारतीय अधिकार्‍यांना अटक

commonwealt new

03 ऑगस्ट :  ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत भारताला 5व्या क्रमांकावर आणून ठेवलंय तर दुसरीकडे भारतीय अधिकार्‍यांमुळे भारतीयांची मान शरमेने खाली घातली आहे. भारतीय ऑलिंम्पिक संघाचे मुख्य सचिव राजीव मेहता आणि कुस्तीचे पंच वीरेंद्र मलिक यांना ग्लासगोमध्ये शनिवारी अटक केली आहे.

स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी तब्बल 61 पदकं जिंकून भारताचं नाव रोषण केलं आहे. मात्र भारतीय अधिकार्‍यांनी बेजबाबदार वर्तन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्कीच केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या कुस्ती पंच वीरेंद्र मलिक विरोधात हॉटेलमधल्या एका महिला कर्मचार्‍याचा लैंगिक छळा केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास स्कॉटलंड पोलिसांनी मलिक यांना अटक केली आहे तर मद्यधुंद अवस्थेत विनापरवाना वाहन चालवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सचिव राजीव मेहता यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे.

या दोघांवर नेमके काय कलम लावण्यात आले आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. या दोघांना ग्लासगोच्या कोर्टात सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. खेळाडूंएवढेच महासंघाचे अधिकारीही अशा स्पर्धांच्या नावाखाली परदेश दौर्‍यावर जातात. यावर लगाम लावण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2014 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close