S M L

नेपाळच्या विकासाठी मोदींचा HIT फॉर्म्यूला

Samruddha Bhambure | Updated On: Aug 3, 2014 07:58 PM IST

नेपाळच्या विकासाठी मोदींचा HIT फॉर्म्यूला

03  ऑगस्ट : भारत आणि नेपाळमधील अतूट नाते कायम राहावे, अशी इच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळला आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारताकडून नेपाळला 10 हजार कोटी नेपाळी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या दौर्‍यात मोदींनी भारत-नेपाळ संबंधांचा HIT फॉम्युलाही दिला आहे.

भारताचा शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळशी मैत्रीचे नवे नाते निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर गेले आहेत. या दौर्‍यात त्यांनी रविवारी संध्याकाळी नेपाळच्या संसदेला संबोधित केले. संसदेतील भाषणाची सुरुवात नेपाळी भाषेतून करत नरेंद्र मोदींनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. उपस्थित लोकप्रतिनिधींनी बाक वाजवून मोदींचं स्वागत केलं. नेपाळच्या विकासात भारत नेहमीच साथ देईल, असे सांगत मोदी म्हणाले, मी नेपाळला HIT फॉर्म्युला देणार आहे. H - हायवे (महामार्ग), I - इन्फो-वे (इंटरनेट आणि डिजिटलायजेशन) आणि T - ट्रान्स वे (दळणवळण आणि वितरण) या तिन्ही क्षेत्रांमध्ये नेपाळने विस्तार केल्यास त्यांचा विकास सहज शक्य होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत आणि नेपाळ यांच्यातील नाते प्राचीन काळापासून चालत आले आहेत आणि त्यामुळे भारत नेहमीच नेपाळच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. नेपाळ ही बुद्धाची भूमी असून युद्ध ते बुद्ध हा प्रवास नेपाळने गाठला. शस्त्रांऐवजी शास्त्रांद्वारेही अडचणींवर मात करता येत,े हे नेपाळने हिंसेवर विश्वास ठेवणार्‍या देशांना दाखवून दिल्याचं ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2014 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close