S M L

तब्बल 32 वर्षानंतर बॅडमिंटनमध्ये भारताला गोल्ड मेडल

Samruddha Bhambure | Updated On: Aug 3, 2014 07:57 PM IST

तब्बल 32 वर्षानंतर बॅडमिंटनमध्ये भारताला गोल्ड मेडल

03 ऑगस्ट :  ग्लासगो इथे सुरू असलेल्या  कॉमनवेल्थ गेम्सचा आज (रविवारी) भारताच्या पी.कश्यपने बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. कश्यपने फायनल राऊंडमध्ये सिंगापूरच्या देरेक वाँगवर 21-14, 11-21, 21-19 अशी मात केली. या विजयामुळे भारताला 32 वर्षांनंतर बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुवर्णपदकाचा दुष्काळ संपविण्यात यश मिळाले आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणखी एक गोल्ड मेडलची अपेक्षा असताना महिला डबल्स बॅडमिंटनमध्ये भारताला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलंय. ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचा मलेशियाच्या वून आणि हू या दोघींनी पराभव केलाय.

भारताची आतापर्यंतची कामगिरी

  • गोल्ड मेडल 15
  • सिल्व्हर मेडल 29
  • ब्राँझ मेडल 19

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2014 07:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close