S M L

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पशुपतीनाथ मंदिरात केली पूजा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2014 12:57 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पशुपतीनाथ मंदिरात केली पूजा

04 ऑगस्ट :   नेपाळ दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरात जाऊन पूजा केली.

पंतप्रधान 2 दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर असून, आज सकाळी नरेंद्र मोदींनी नेपाळमधील भगवान शंकराच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर नेपाळचे अध्यक्ष राम बरन यादव यांची भेट घेतली.

पशुपतीनाथाचे मंदिर हे युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे. या मंदिरात फक्त नेपाळच्या राजघराण्यातील व्यक्तीच पूजा करू शकतात. मात्र, आज राजघराण्याच्या परवानगीनंतर मोदींना पूजा करण्याची संधी मिळाली. मोदींसोबत 102 पुजार्‍यांनीही पूजा केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2014 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close