S M L

सुहास खामकरला 50 हजारांची लाच घेताना अटक

Sachin Salve | Updated On: Aug 4, 2014 07:10 PM IST

सुहास खामकरला 50 हजारांची लाच घेताना अटक

04 ऑगस्ट : 'भारत श्री' किताब पटकावणारा शरीरसौष्ठपटू सुहास खामकर यांना 50 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. पनवेल लाचलुचपत विभागाने ही कारवाई केलीय.

भारत श्री किताबासह शरीरसौष्ठ स्पर्धेत भरीव कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारने सुहास खामकरची पनवेलमध्ये नायब तहसिलदारपदी नियुक्ती केली होती.

मात्र आज सातबारावर नोंद करण्यासाठी खामकर यांनी 50 हजारांची लाच मागितली. 50 हजारांची ही लाच घेताना खामकर यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2014 07:10 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close