S M L

पुण्यातल्या रिक्षा चालकांचा संप अखेर मिटला

7 मे पुण्यातल्या रिक्षा चालकांचा संप अखेर मिटलाय. संप मागं घेत असल्याची घोषणा रिक्षाचालकांनी बुधवारी रात्री केली. त्यापूर्वी संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात एक बैठक झाली होती. पालकमंत्री अजित पवार, रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव, विभागीय आयुक्त दिलीप बंड आणि रिक्षा चालक संघटनांंचे नेते बैठकीला हजर होते. पण बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. आता संप मिटल्यानमुळे पुणेकरांना अखेरीस दिलासा मिळाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून होत असलेले त्यांचे हाल आता संपले आहेत. या संपानंतर सरकार आणि रिक्षाचालकांमध्ये बोलणी झाली असून पहिल्या किलोमीटरसाठी दहा रूपये भाडे करावं अशी मागणी रिक्षावाल्यांनी केली होती. तर नऊ रूपये भाडे करा असं सरकारचं म्हणंणं होतं. त्याच्यानंतरच्या किलोमीटरसाठी सात रूपये भाडे असावं अशीही सरकारची भूमिका होती. पण पहिल्या किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी आठ रुपयेच भाडे राहू देत या मुद्यावर रिक्षावाले अडून बसले होते. यावर अखेर तोडगा निघालाय आणि रिक्षाचालकांनी माघार घेतल्यामुळे संप मिटलाय. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या रिक्षांच्या संपामुळे पुण्यात नागरिकांचे हाल होत होते. तसंच याआधी पुण्यात परिवहन विभाग आणि रिक्षा चालक -मालक संघटनांमधली बोलणीही फिस्कटली होती. त्यामुळे मंत्रालयातल्या या बैठकीकडे सर्वच पुणेकरांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण या बैठकीनंतरही पुणेकरांची पूर्णपणे निराशा केली होती.या संपाबाबत खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मध्यस्तीची तयारी दाखवली होती. प्रवाशांचे अशाप्रकारे हाल करण्याचा अधिकार रिक्षाचालकांना नाही, त्यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढावा त्यांच्याशी चर्चा करायला आपण तयार आहोत असंही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये म्हंटलं होतं. पुण्यात यापूर्वीही रिक्षाचालकांचा असाच संप झाला होता. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाने पुण्यातल्या नागरिकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. पुण्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या रिक्षा संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव, विभागीय आयुक्त दिलीप बंड आणि रिक्षा चालक संघटनांचे नेतेही बैठकीला हजर होते. भाडे कपातीच्या मुद्‌य्यावरून रिक्षा संघटनांनी गेल्या सहा दिवसांपासून पुकारलेल्या संपावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. पण आयबीएन-लोकमतनं हा विषय लावून धरला होता. त्यामुळे आगोदरच पेटलेल्या चर्चेला वेग आला. संपामुळे नागरिकांचे होणारे हाल, आणि त्यांचा संतापही दाखवण्याचा यात प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर हा संप मिटवण्यासाठी काही ठोस पाऊलं उचलण्यात पुण्यातील नागिरकांना आणि सरकारला यश आल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2009 09:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2009 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close