S M L

दीपक केसरकर आज शिवसेनेत करणार प्रवेश

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2014 07:40 PM IST

Kesarkar new05 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे सावंतवाडीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर आज (मंगळवारी) राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहेत. आज दुपारी तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार्‍या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केसरकरांसोबत त्यांचे 5 हजार समर्थक कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

केसरकराच्या शिवसेनेत जाण्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सावंतवाडी मतदार संघात राष्ट्रवादीला मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचं बोललं जातंय.

त्याचबरोबर शिवसेनेच्या नारायण राणेंविरोधातल्या लढाईला केसकरांच्या कार्यकर्त्यांचे बळ मिळणार असून शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार आहे. केसकरांच्या पक्षप्रवेशाची संपुर्ण तयारी सावंतवाडी जिमखान्यावर करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2014 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close