S M L

राष्ट्रवादी 144 जागांवर ठाम - अजित पवार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 5, 2014 09:17 PM IST

23ajit_pawar

05 ऑगस्ट :  विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. 144 जागा द्या नाहीतर स्वबळावर लढा असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. काँग्रेसनेही जशाच तसे उत्तर देत एक जागाही वाढून भेटणार नाही असं स्पष्ट भूमिका घेतली.

आज परभणीमध्ये अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी 144 जागांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेत काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. तेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाढवून मिळाव्या, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. काँग्रेसला जागावाटपाचा निर्णय मान्य नसेल तर स्वबळावर लढू, असं अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीने 144 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असला तरी काँग्रेसने मात्र राष्ट्रवादीला 125 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. जागा वाढवून देणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2014 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close