S M L

बॉडीबिल्डर सुहास खामकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 5, 2014 09:17 PM IST

बॉडीबिल्डर सुहास खामकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी

 05 ऑगस्ट : बॉडीबिल्डर आणि पनवेलचे नायब तहसीलदार सुहास खामकरला 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडल्यानंतर आज रायगड जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले सुहास खामकर हे पनवेल येथे नायब तहसीलदार म्हणून काम करत होते. यावेळेस रायगड जिल्ह्यातील पनवेल इथल्या एका जमिनीच्या सातबारावर नोंदणी करण्यासाठी सुहास खामकरने 1 लाख रुपयांची लाच मागितली होती.  गणेश भोगाडे यांनी तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 50 हजार रुपये देण्याचे तक्रारदारांनी मान्य केले होते. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर रायगडच्या लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता आणि खामकरला रंगेहाथ अटक करण्यात आली. दरम्यान, आज या दोघांनाही रायगडच्या अलिबाग सत्र न्यायालयात हजर केले आणि 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2014 09:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close