S M L

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतल्या 900 गावांमधला इको-सेन्सिटिव्ह झोन उठवला

Samruddha Bhambure | Updated On: Aug 6, 2014 07:49 PM IST

सिंधुदुर्ग, रत्नागिरीतल्या 900 गावांमधला इको-सेन्सिटिव्ह झोन उठवला

06 ऑगस्ट : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील 900 गावं इको-सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली. या निर्णयामुळे या गावांतील विकासकामांना चालना मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील काही गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे या गावांतील घरांच्या दुरुस्तीसह इतर विविध विकासकामे थांबविण्यात आली होती. खासदार विनायक राऊत यांनी हा विषय पर्यावरण मंत्रालयापुढे लावून धरला होता. राज्य शासनाच्या निष्क्रियतेमुळे कोकण विकासापासून वंचित राहिला असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी यावेळी केला. इको-सेन्सिटिव्ह झोनमुळे या गावांमध्ये नवे उद्योग येण्यात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे त्याला अनेकांनी विरोध केला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2014 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close